Ambernath Municipality Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : अंबरनाथ नगरपालिकेच्या विभागप्रमुखाला तक्रारदाराची मारहाण; मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे कामबंद

Ambarnath news : अंबरनाथ शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीण गोसावी हे अंबरनाथ शहरातील अनधिकृत होर्डिंग्जबाबत मागील काही महिन्यांपासून नगरपालिकेत तक्रार करत होते

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराने नगरपालिकेच्या मिळकत विभाग प्रमुखाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार घडल्यानंतर यानंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं असून संबंधित तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अंबरनाथ (Ambarnath) शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीण गोसावी हे अंबरनाथ शहरातील अनधिकृत होर्डिंग्जबाबत मागील काही महिन्यांपासून नगरपालिकेत तक्रार करत होते. त्यांच्या तक्रारीनुसार नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई देखील सुरू केली. मात्र नंतर ही कारवाई थांबवल्याचा प्रवीण गोसावी यांचा आरोप होता. याबाबत जाब विचारण्यासाठी गोसावी हे आज अंबरनाथ नगरपालिकेचे मिळकत विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यात वाद होऊन प्रवीण गोसावी यांनी गायकवाड यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसंच या घटनेनंतर काम बंद आंदोलन पुकारत प्रवीण गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

अंगावर धावून आल्याचा तक्रारदाराचा दावा 

दरम्यान, याबाबत प्रवीण गोसावी यांनी मात्र सचिन गायकवाड हेच आधी आपल्या अंगावर धावून आले आणि आपण प्रतिकार केल्याचा दावा केला आहे. गायकवाड यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून चूक कुणाची आहे? हे समोर आणावं आणि माझ्यावर कारवाई करणार असाल, तर गायकवाड यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करावी; अशी मागणी गोसावी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT