Crime Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Crime : अंबरनाथच्या हेरंब मंदिरात चोरी; गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने लंपास, चार दानपेट्याही फोडल्या

Ambarnath News : पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडत दोन चोरटे मंदिरात शिरले. या चोरट्यांनी आधी सीसीटीव्हीच्या वायर तोडल्या.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात बुधवारी पहाटे चोरी झाल्याचे उघडकीस आले. मंदिरातून चोरट्यांनी गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने लांबविले. इतकेच नाही तर मंदिरातील चार दानपेट्यांमधील रोख रक्कम चोरून नेली असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

अंबरनाथच्या खेर सेक्शन परिसरात हेरंब मंदिर असून मंदिरात बुधवारी पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडत दोन चोरटे मंदिरात शिरले. या चोरट्यांनी आधी सीसीटीव्हीच्या वायर तोडल्या. त्यानंतर मंदिरातील कपाट उघडून त्यातून रोख रक्कम चोरली. मंदिरातील अवजारे वापरून या चोरट्यांनी मंदिराच्या चार दानपेट्या फोडल्या. तसंच गाभाऱ्यात लॉकरमध्ये असलेले गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने सुद्धा चोरून नेले. सकाळी मंदिरात पुजारी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मंदिरात धाव घेत तपासाला सुरुवात केली. 

पोलिसांचे पथक रवाना 

चोरटे मंदिरात शिरताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ही चोरी रेकी करून करण्यात आल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात आला असून चोरट्यांच्या तपासासाठी टीम रवाना केल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. तर पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करत असून या चोरट्यांना शोधून काढण्याची मागणी हेरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमण यांनी केली आहे. दरम्यान, या चोरीमुळे बुधवारी दिवसभर मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निकाला आधीच विजयाचा जल्लोष! पुणे मार्केट यार्डात सुनेत्रवाहिनींचे बॅनर झळकले

MI vs CSK: दुखापत सँटनरच्या खांद्याला, तरीही शार्दुल कसा खेळला? मुंबई इंडियन्सने दिलं उत्तर

Weight Loss Recipe : डाएटला करा टाटा, बाय बाय; चटपटीत चाट खाऊन वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Good News : मुंबई-पुण्यातून धावणार २४८ विशेष उन्हाळी ट्रेन, सर्व यादी एका क्लिकवर

डोंबिवलीत स्टंटबाजांचा कहर! बाईकवर उभा राहून तरुणाचा जीवघेणा स्टंट, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT