Amaravati Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Amaravati: बाजार समितीत अडते, व्यापारींचे आंदोलन; खरेदी बंद असल्याने शेतकरी संतप्त

बाजार समितीत अडते, व्यापारींचे आंदोलन; खरेदी बंद असल्याने शेतकरी संतप्त

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी एका व्यापाराच्या दुकानातून एक लाख पन्नास हजाराची चोरी (Theft) झाली. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढिसाळ सेक्युरिटी व डीसाळ कारभारामुळे ही चोरी झाल्याचा आरोप करत अडते व व्यापारांनी खरेदी बंद करून बाजार समितीच्या (Bajar Samiti) प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. (Letest Marathi News)

दिवाळीनंतर (Diwali) आज सोमवार असल्यामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी (Farmer) हजारो क्विंटल शेतमाल विक्रीसाठी आणला. मात्र व्यापारी आणि अडते यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे व्यापाऱ्याची खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांचा वाद बाजूला ठेवून शेतमालाची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

नुकसान भरपाई द्यावी

तर व्यापाऱ्यांचा शेतमाल जो चोरी झाला त्याची नुकसान भरपाई बाजार समितीने भरून द्यावी; अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. मात्र असे असताना बाजार समितीमध्ये मोठ्या तणाव पाहायला मिळाला. यावेळी संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

चार तासांनंतर आंदोलन मागे

अखेर चार तासांनंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यपाऱ्यांचे आंदोलन मागे. कृषी उत्पन्न बाजार समितीने चोरी गेलेल्या शेतमालाची भरपाई करत एक लाख पन्नास हजार रुपयांचा चेक दिला. लगेच शेतकाऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुद्धा सुरवात झाली असुन शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भयंकर! १४ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणात आरोपी भीमरावविरोधात आरोप निश्चित

Manoj Jarange Patil: उष्माघातानं जीव गेला तर जाऊ दे! सरकार जबाबदार असेन; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Heatwave in India: उष्णतेचा कहर वाढला! डॉक्टरांनी दिला हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनपासून बचावाचा गंभीर इशारा

महागड्या गोळ्या-औषधं खाणं टाळा! शरीरातील रक्त वाढवण्यासाठी खा 'ही' ५ फळे

SCROLL FOR NEXT