shivshahi bus saam tv
महाराष्ट्र

St Strike: बंद शिवशाही बस ठरताहेत डोकेदुखी; अनेक बसेच भंगारात जाण्याची शक्यता

बंद शिवशाही बस ठरताहेत डोकेदुखी; अनेक बसेच भंगारात जाण्याची शक्यता

अरुण जोशी

अमरावती : गत तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अद्यापही संप मिटलेला नाही. त्यामुळे पूर्णत: बस रस्त्यावर थावत नाहीत. जिल्ह्यात शिवशाहीच्या ४५ बस एकाच जागेवर उभ्या आहेत. यामुळे मेंटेनन्सचा खर्च वाढला असून ही बाब महामंडळाला (MSRTC) डोकेदुखी ठरत आहे. (amaravati news Closed Shivshahi buses are a headache)

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांपासून संप (St Strike) पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे महामंडळालाही आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. बसेस उभ्या असल्याने मेंटनन्सचा खर्च वाढला आहे. (Amaravati) महामंडळाला महिन्याला मेटेंनन्ससाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च येत असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

दिवसातून एकदा सुरु करावीच लागते बस

तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (St Employee) संप सुरूच असल्याने जिल्ह्यातील बस बंदच आहेत. बस एकाच जागी उभ्या असल्यास त्यातील मेंटेनन्स ठेवावे लागते. काही बस बंदही पडतात. त्या बसला दिवसातून एकदा सुरु करावे लागतात. आगारातील स्पेअर पार्ट चोरीला जाऊ नयेत, कोणतेही साहित्य बाहेर जाऊ नये, अनोळखी व्यक्ती आत येऊ नये यासाठी प्रत्येक आगारात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे चोरीचा प्रकार घडत नसला तरी मेंटेनन्स खर्च वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT