Prakash Ambedkar On Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: 'उद्धव ठाकरेंसोबतची युती आता होणार नाही', प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Prakash Ambedkar On Uddhav Thackeray: वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्यातील युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रामू ढाकणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची युती झालेली होती. मात्र ती आता तुटलेली आहे आता काहीही राहिलं नाही. त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये आम्ही बैठक घेऊन या सगळ्या प्रश्नावरती उत्तर देऊ, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबतच्या आपल्या युतीबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. 'साम टीव्ही'शी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही भाष्य केलं आहे. जरांगे पाटील म्हणजे होते की, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत ते २८८ उमेदवार उभे करणार यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की, ''मला असं वाटतं की, मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावं आणि नाही झाल्या तरीही लढावं. मात्र २८८ जागेवर त्यांनी गरीब मराठा उमेदवार द्यावे. फक्त एसी आणि एसटी जागा सोडून.''

ते म्हणाले, ''लोकसभा निवडणुकीत जे ३१ खासदार निवडून आलेले आहेत, मराठा समाजाचे ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. जरांगे पाटलांना जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल, तर त्यांनी एसी आणि एसटीच्या जागा सोडून इतर जागेवर गरीब मराठा उमेदवार द्यावेत.''

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''लाडकी बहीण योजने संदर्भात ज्या काही दोन-चार कविता आल्या त्या फार चांगल्या आल्या. तुम्ही दीड हजार रुपये महिना दिला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पण या दीड हजारामध्ये आम्हाला गॅस स्वस्त मिळणार का? या दीड हजारामध्ये जी महागाई वाढलेली आहे, ती पौष्टिक आहार खाऊ देणार का?

ते पुढे म्हणाले, ''उद्या चालून मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवावी, ज्यामध्ये शरद पवार, छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांना बोलवावं. कुणी वाद लावत आहे, लावत नाही, हा विषय वेगळा, परंतु जरंगे पाटलांचा जो विषय आहे की, मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण द्या, हा जो प्रश्न उपस्थित केला, त्याच्या संदर्भात त्यांनी बोलावं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rubina Dilaik : जुळ्या मुलींच्या जन्मानंतर आता दुसऱ्यांदा आई होणार टिव्हीची 'छोटी बहू'? गुडन्यूज देत VIDEO केला शेअर

Ajit Pawar Death: आता रडत बसू नका..., अजित पवारांचा अखेरचा निरोप; AI व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने, बारामतीत शोकाकुल वातावरण

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार

Ajit Pawar Death: काटेवाडीतील निवासस्थानी अजितदादांना अखेरची सलामी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT