Gangabai Ghat Nagpur Saam Tv
महाराष्ट्र

नागपूरात अस्थी तस्करीचा आरोप; गंगाबाई स्मशानभूमीतील प्रकार

अस्थी चोरी प्रकरणाची होणार चौकशी

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूरातील गंगाबाई स्मशानभूमीत चार प्रेतांच्या अस्थी चोरीला (Theft) गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काल अंत्यसंस्कार केलेल्या चार प्रेतांच्या अस्थी विसर्जनासाठी आज नातेवाईक स्मशानघाटावर गेले. मात्र, चारंही प्रेतांच्या अस्थी दिसत नसल्याची नातेवाईकांची तक्रार आहे. प्रेतांच्या अस्थी नेमक्या गेल्या कुठे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नातेवाईक मृतकांच्या अस्थी शोधत आहेत. (Nagpur Latest News)

हे देखील पहा -

दरम्यान माजी नगरसेवक भास्कर पराते या स्मशानभूमीत अस्थी तस्करी होत असल्याचा आरोप केलाय. एकाच वेळी चार मृतदेहांच्या अस्थी चोरी गेल्यानं हा तस्करीचा प्रकार आहे. भटक्या कुत्र्यांनी आजपर्यंत असा प्रकार केला नाही. त्यामुळं ही मानवी चोरी असल्याचा आरोप करत चौकशी मागणी केली आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र चोरीचा आरोप फेटाळून लावलाय. भटक्या कुत्र्यांकडून हा प्रकार झाला असावा असा संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलं. चार प्रेत्यांच्या अस्थी चोरी मुळं मात्र खळबळ उडाली आहे. अस्थी चोरीमागे कोण आणि कशासाठी असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्वात मृतांच्या नातेवाईकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT