Dr. Narendra Dabholkar Death Case Saam TV
महाराष्ट्र

Dr. Narendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील सरकारचे साक्षी पुरावे संपले; CBI कडून न्यायालयात अर्ज

Dr. Narendra Dabholkar Death Case: नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील सरकारी साक्षी, तसेच पुरावे सादर करण्याचे कामकाज संपले असल्याचे CBI कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

CBI Final Report In Dr Narendra Dabholkar Case: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील सरकारी साक्षी, तसेच पुरावे सादर करण्याचे कामकाज संपले असल्याचे सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवार (१३, सप्टेंबर) ला याबाबतचा अंतिम अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सादर करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणात बुधवारी (ता.१३) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) साक्षी पुरावे संपल्याबाबतचा अर्ज दाखल केला. त्यामुळे आता आरोपींचे जबाब नोंदविले जाणार असून त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील.

विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात हा अर्ज सादर करण्यात आला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला गोळ्या झाडून नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा पुणे पोलिस, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि त्यानंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.

या गुन्ह्यामध्ये डॉ. विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. सरकारी पक्षाने साक्षी पुरावे संपल्याची माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT