alegaon bandh to forced conversion case saam tv
महाराष्ट्र

Akola News : धर्मांतर प्रकरण ? आलेगावात कडकडीत बंद, पोलिसांचा तगडा बंदाेबस्त

Alegaon Bandh Today : आलेगावात आरसीपीच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने 

Akola News : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज (शनिवार) आलेगाव बंदची हाक देण्यात आली हाेती. या आवाहनास प्रतिसाद देत आज सकाळपासून आलेगाव येथ कडकडीत बंद (alegaon bandh) पाळण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिसांनी देखील आलेगाव येथे बंदाेबस्त ठेवला आहे. (Maharashtra News)

आलेगावातील (akola) एका 19 वर्षीय युवकाचे चार लोकांनी जबरदस्ती धर्मांतरण घडवून आणल्याची तक्रार मुलाच्या आईने चान्नी पोलिस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी दिली होती. त्याबाबतचा तपास सुरु आहे. धर्मांतरण झाल्याचा आरोप असलेल्या युवकाची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली. दरम्यान पोलिसांनी चार संशयितांना हैद्राबाद येथून अटक केली.

या प्रकरणाचे पडसाद अकाेला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उमटायला लागल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुद्धा स्वतः आलेगावात येऊन या प्रकरणाची पडताळणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाच्या निषेधार्थ गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज (शनिवार) आलेगाव येथे शांततेत बंद पाळण्यात आला आहे. या स्वयंस्फूर्त बंदला आलेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळपासून आलेगावातील दुकाने, बाजारपेठ बंद आहेत.

खाजगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या गावात आरसीपीच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच पातुर, बाळापूर येथील पोलीस ठाण्यांचे कर्मचारी देखील आलेगावात दाखल झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT