akshay hirve catches python 
महाराष्ट्र

अक्षय हिरवेने पकडला नऊ फुट अजगर; बोंद्री ग्रामस्थांना दिलासा

ओंकार कदम

सातारा : पाटण तालुक्यातील बोंद्री या गावामध्ये बुरंबेश्वर मंदिरा पाठीमागे सुमारे नऊ फुट लांबीचा अजगर सापडला. सुमारे २५ किलाे वजन असलेल्या या अजगरास सर्प मित्र अक्षय हिरवे व त्यांच्या सहका-यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला.

बुरंबेश्वर मंदिरानजीक ग्रामस्थांना हा अजगर दिसला हाेता. ग्रामस्थ घाबरले. काही ग्रामस्थांनी सर्पमित्र अक्षय हिरवे यांच्याशी संपर्क केला. अजगर असल्याची माहिती हिरवे यांनी दिली. हिरवे यांनी अन्य सर्प मित्रांसमवेत बुरंबेश्वर मंदिर गाठले. या मंदिराच्या पाठीमागे एका झुडपात अजगर हाेता. त्याची हालचाल पाहून हिरवे यांनी त्याची शेपटी पकडली व त्याला झुडपातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी अजगरास पाेत्यात घालण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या प्रयत्नांत यश आले नाही. त्यानंतर हिरवे यांनी अजगराच्या ताेंडावर एक दाेन पाेती टाकली. त्याच्या ताेंड दाबले. लगेच त्याला उचलले आणि पाेत्यात टाकले. हा प्रसंग पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी हिरवे व सहका-यांचे काैतुक केले. हिरवे यांनी अजगर akshay hirve catches python वनविभागाच्या ताब्यात दिले. यावेळी ग्रामस्थांनी सर्व सर्प मित्रांचे आभार मानले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT