Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Crime: काळवीटाच्या मासाची बाजारात विक्री; दाेघे अटकेत, एक फरार

या प्रकरणातील एकाचा वन विभाग शाेध घेत आहे.

जयेश गावंडे

अकोला : जंगलात (jungle) शिकार करून काळवीटाच्या मासांची बाजारात विक्री करणारी टोळी वनविभागाने (forest) जेरबंद (arrest) केली आहे. अकोला (akola) जिल्ह्यातल्या अकोट (akot) तालुक्यातील गरसोळी शेत शिवारात वन्यप्राणी काळवीटाची शिकार करून काळवीटचे मांस बाजारात विक्री करताना वनविभागाने सापळा रचून टोळीचा पर्दापाश केला आहे. (akola latest marathi news)

किसन नरोकर, विक्रम टाकसाळे आणि भीमराव सोळंके असे संशयित आरोपींची नाव असून हे तिघे काळवीटाची शिकार करून ती कावसा या गावातील बाजारांत मासांची विक्री करत होते. यापैकी भीमराव सोळंके हा घटनास्थळावरून फरार झाला.

वनविभागाने या संशयितांकडून काळवीट मांस, एक दुचाकी (vehicle) आदी साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई अकोट वर्तुळ वनकर्मचारी सी. एम. तायडे, वनरक्षक सोपान जी. रेळे, मोहन वानखडे, सोमंत रजाने, दिपक मेसरे आदींनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8AM Diabetes Symptoms: सकाळी उठल्यावर ब्लड शुगर का वाढलेली असते? 5 गोष्टी ठरतात कारणीभूत

Maharashtra Live News Update: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

Shocking: नात्याला काळिमा! भावाने केला बहिणीवर बलात्कार अन् टेरेसवरून दिले फेकून, ८ वर्षांपासून करत होता अत्याचार

Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळ फटका, विदर्भाला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

BSNL Recruitment: बीएसएनएलमध्ये नोकरीची संधी; १२० पदांसाठी भरती; पगार ५० हजारांपर्यंत; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT