Akola Crime Saam TV News
महाराष्ट्र

Akola Crime: ऑटो रिक्षाचा दुचाकीला धक्का अन् रात्रीच राडा, धारदार शस्त्राने वार करत एकाला संपवलं

Akola Violence: अकोल्यातील अकोट फैल भागात किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला झाला. धारदार शस्त्राने तुफान हल्ला करून एकाचा खून, तिघे गंभीर जखमी. पोलीस तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यातील अकोट फैल भागात किरकोळ वादातून हत्याकांड घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऑटोरिक्षाचा दुचाकीला लागलेल्या धक्क्यामुळे वाद उफाळून आला. शाब्दिक वाद थेट जीवघेण्या हल्ल्यात रूपांतरीत झाला. ऑटोरिक्षा चालक आणि दुचाकीस्वाराने एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले असून, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अकोट फेल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ही घटना अकोल्यातील अकोट फैल भागात रात्री उशीरा घडली. ऑटो रिक्षाचा धक्का एका दुचाकीला लागला. या क्षुल्लक कारणावरून रिक्षा चालक आणि दुचाकीस्वार एकमेकांवर भिडले. वाद टोकाला केला. शाब्दिक वादाचं रूपांतर थेट हत्येपर्यंत पोहोचलं. या दरम्यान, दोघांकडे धारदार शस्त्र होते. दोघांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ३ ते ४ जण रक्तबंबाळ झाले.

गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने रूग्णालयात पाठवण्यात आलं. उपचार घेत असतानाच एकाचा मृत्यू झाला. अहमद खान शाकूर खान असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा तरूण दुचाकीवर पाठीमागे बसला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करत गुन्हा नोंदवून घेतला. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. जखमींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास अकोट फैल पोलीस करीत आहेत.

विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

नागपूरच्या टाकळघाट परिसरातील २१ वर्षीय विवाहितेने शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेचे वडील रामदास मेघरे यांनी केला आहे. रामदास मेघरे यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचा पती आणि सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे या प्रकरणी दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT