akola news Saam Tv News
महाराष्ट्र

Akola Shocking News: शिक्षकाचा प्रताप! शिक्षकानं पाटी देण्याऐवजी हातात दिली बाजाराची पिशवी, अकोल्यातील संतापजनक घटना

Akola ZP School Teacher: जिल्हा परिषदेतील एका शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात शिक्षकानं आपल्या काही विद्यार्थ्यांच्या हाती पाटी नसून, चक्क भाजीपाला खरेदीसाठी पिशवी दिली आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय गवळी, साम टीव्ही

शालेय शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत उज्वल वाट दाखवतात. उत्तम भविष्यासाठी मार्गदर्शन करतात. पण अकोल्यातील जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकाचा वेगळाच प्रकार समोर आलाय. एका शिक्षकानं आपल्या काही विद्यार्थ्यांच्या हाती पाटी नसून, चक्क भाजीपाला खरेदीसाठी पिशवी दिली आहे. जिल्हा परिषदेतील शाळेसमोर आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारात एका शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जात भाजीपाला खेरदीच्या कामाला लावलं. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरीकांनी संताप व्यक्त केलाय.

अकोल्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील एका व्हिडिओमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकोल्यातल्या राजनापूर खिनखिनी गावातल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाच्या प्रतापामुळे परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केलाय. यात एका शिक्षकाने भाजीपाला खरेदीसाठी चक्क विद्यार्थ्यांना बाजाराची पिशवी पकडण्यासाठी सोबत नेलंय.

या गावात दर मंगळवारी राजनापुर खिनखिनी गावात आठवडी बाजार भरतो. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या अगदी समोर हा बाजार भरतो. या बाजारात अनेक प्रकारच्या वस्तू आणि भाजीपाला मिळतात. याच बाजारातील भाजीपाला खरेदी करण्यासाठी शिक्षकानं चक्क ४ ते ५ विद्यार्थ्यांना सोबत नेलं आहे. इतकंच नाही तर, त्यांच्या हातात भाजीपाला खरेदी करण्यासाठी पिशवी देखील दिली आहे. शिक्षक आधी भाजीपाला खरेदी करतो आणि नंतर मुलांच्या पिशवीत टाकतो.

दर मंगळवारी हा आठवडी बाजार भरतो. दरम्यान, दर मंगळवारी जिल्हा परिषदेतील हा शिक्षक विद्यार्थ्यांना बाजारात पिशव्या पकडण्यासाठी घेऊन जात असल्याचं काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे. शिक्षक शालेय वेळेत घरगुती कामासाठी विद्यार्थ्यांचा वापर करीत असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर काही नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT