Shocking Attack on Journalists Saam Tv News
महाराष्ट्र

बातमी लावल्याचा राग! संपादकासह पत्रकारांवर प्राणघातक हल्ला, कोयत्यानं सपासप वार | Akola Crime

Shocking Attack on Journalists: अकोल्यात बातमी लावल्याच्या रागातून पत्रकारांवर कोयत्याने हल्ला. पाच ते सहा तरुणांनी मिळून चार पत्रकार जखमी केले. परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

  • अकोल्यात बातमी लावल्याच्या रागातून पत्रकारांवर कोयत्याने हल्ला.

  • पाच ते सहा तरुणांनी मिळून चार पत्रकार जखमी केले.

  • तडीपार झालेल्या आरोपींबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे संताप.

  • काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची घटनास्थळी भेट; पोलिसांवर नाराजी.

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बातमी लावण्याच्या रागातून पत्रकारांवर कोयत्यानं प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. पाच ते सहा तरूणांनी कोयत्यानं हल्ला चढवत जवळपास चार जणांना जखमी केलं आहे. ही धक्कादायक घटना जनता भाजी बाजारात घडली असून, सध्या जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

बातमी लावल्याच्या रागातून पत्रकारांवर प्राणघातक हल्ला चढवण्यात आला आहे. ही संतापजनक घटना अकोल्यातील जनता भाजी बाजारात घडली आहे. पाच ते सहा तरूणांनी मिळून कोयत्यानं हल्ला चढवत चार जणांना जखमी केलं आहे. अलिकडेच अकोला पोलिसांनी २ जणांना तडीपार केलं होतं.

यासंदर्भात त्यांच्याबाबत बातमी प्रकाशित करताच आरोपींना राग अनावर झाला. त्यांनी बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांना शोधलं. तसेच बातमी लावल्याच्या रागातून हल्ला चढवला. अकोल्यातील एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये तडीपार संदर्भात बातमी प्रकाशित केली होती, त्यावरून हा संपूर्ण वाद झाला असल्याची माहिती आहे.

लोकल वृत्तपत्राच्या संपादकासह चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण घटनास्थळी दाखल झाले, तसेच अकोला पोलिसांवर ताशेरे ओढले. सध्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा राजीनामा

Maharashtra News Live Update: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख रुपयांचा अपहार

Pakistan Blast : पोलीस चौकीवरील हल्ल्यात 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या; जंगलात आढळला जळालेला मृतदेह, चाहत्यांमध्ये खळबळ

Helmet Expiry Date Checking Tips: हेल्मेट किती वर्षे वापरावे? 'हे' आहेत हेल्मेट बदलण्याचे 3 महत्त्वाचे संकेत; आजच तपासा

SCROLL FOR NEXT