Akola : पाणीपट्टी करवाढीविरोधात शिवसेनेचे महापालिकेसमोर आंदोलन SaamTvnews
महाराष्ट्र

Akola : पाणीपट्टी करवाढीविरोधात शिवसेनेचे महापालिकेसमोर आंदोलन

पाणीपट्टी करवाढ विरोधामध्ये शिवसेनेने अकोला महापालिकेसमोर आज आंदोलन केले.

जयेश गावंडे

अकोला : पाणीपट्टी करवाढ विरोधामध्ये शिवसेनेने अकोला महापालिकेसमोर आज आंदोलन केले. या आंदोलनामध्ये (Agitation) शिवसेनेने पाणीपट्टी करच्या पावत्याची होळी करीत मनपातील भाजप सत्तेधारी व मनपा प्रशासन यांचा विरोध केला. भाजप विरोधात जोरदार नारेबाजी करीत ही वाढीव पाणीपट्टी कर दरवाढ कमी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने (Shivsena) रेटून धरली.

हे देखील पहा :

महापालिकेने (Akola Muncipal Corporation) नागरिकांना वाढीव पाणीपट्टी कर वाढीची बिले दिली आहे. त्यामुळे नागरिकांचे खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न भाजप सत्ताधारी व मनपा प्रशासन करीत असून मनपा जादा कर वसुली करीत आहे. या विरोधामध्ये शिवसेनेने आवाज उठवीत महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपातील भाजप सत्ताधारी व मनपा प्रशासना विरोधात नारेबाजी करत वाढीव पाणीपट्टी कर कमी करावी, अशी मागणी केली.

त्यासोबतच नागरिकांच्या पाणीपट्टी कर पावत्यांची होळी करीत भाजप (BJP) सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. मनपातील शिवसेनेचे गटनेता नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वामध्ये निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या महिला नगरसेविका व पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT