Passenger trains stand halted as railway block in Akola disrupts services in Bhusawal division Saam TV Marathi News
महाराष्ट्र

महत्त्वाची बातमी! भुसावळ विभागातील सर्व रेल्वे पॅसेंजर गुरूवारी रद्द, अनेक एक्सप्रेस धावणार २ तास उशिराने

Buldhana train cancellation : अकोला येथे नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे भुसावळ विभागातील अनेक पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही एक्सप्रेस गाड्या 2-3 तास उशिराने धावणार आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासावे.

Namdeo Kumbhar

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

Indian Railways latest updates : अकोल्यात नॉन-इंटरलॉकिंगसाठी गुरूवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम भुसावळ रेल्वे विभागावर पडणार आहे. कारण, शेगाव-बुलढाणाकडे धावणाऱ्या सर्व रेल्वे पॅसेंजर गाड्या गुरूवारी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक एक्सप्रेस गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावण्याची शक्यता आहे. या ब्लॉकचा परिणाम वर्धा, भुसावळ, बडनेरा या पॅसेंजरवर पडणार आहे. तर काही एक्सप्रेस गाड्याही रद्द होणार आहेत. त्यामुळे शेगावला दर्शनासाठी जात असाल तर आधीच प्रवासाचे नियोजन करावे.

भुसावळ विभागातील पारस-गायगाव-अकोला दरम्यान अप व डाउन दोन्ही मार्गावर ऑटोमॅटिक ब्लॉक सेक्शनच्या कामासाठी 'नॉन-इंटरलॉकिंग' विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी काही प्रवासी गाड्या रद्द करण्यात येणार असून, काही गाड्यांचे नियमन (विलंब) करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १११२१ भुसावळ-वर्धा मेमू, गाडी क्रमांक ६११०२ बडनेरा-भुसावळ मेमू, गाडी क्रमांक ६११०१ भुसावळ-बडनेरा मेमू तसेच गाडी क्रमांक १११२२ वर्धा-भुसावळ मेमू या गाड्या रद्द करण्यात येत आहेत. याशिवाय काही गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २०८२० ओखा-पुरी एक्स्प्रेस ही शेगाव ते श्रीक्षेत्र नागझरी दरम्यान सुमारे २ तास २५ मिनिटे उशिराने धावेल.

गाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान सुमारे २ तास २० मिनिटे विलंबित राहील. तसेच गाडी क्रमांक १२४८५ हजूर साहिब नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान सुमारे २ तास विलंबाने धावेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, ही कामे पायाभूत सुविधांच्या देखभाल व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earphone : जास्त हेडफोन वापरल्याने व्हाल बहिरे! कसा कराल सुरक्षित वापर

Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

Helmet Buying Tips: हेल्मेट घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवाच

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

SCROLL FOR NEXT