अकोला जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसलाय. जिल्ह्यातील अकोट शहरात प्रहार पक्षात राजीनाम्यांचं सत्र सुरुच आहे. या शहरातील बऱ्याच प्रमुख पाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षातील अंतर्गत डावपेच, कलह, गटबाजी, वरिष्ठ पदाधीकाऱ्यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे या कारणांमूळ हे राजीनामे दिल्या जात आहेत, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
आता पुन्हा अकोट शहराध्यक्ष सागर उर्फ त्र्यंबक आप्पा उकंडे यांनी आपला पदाचा राजीनामा दिलाय. उकंडे हे प्रहार पक्षातील जूने पदाधिकारी असून त्यांनी अकोट तालुक्यातील अपंगांसाठी तसेच रस्त्याच्या विकास कामांसाठी प्रचंड आंदोलन त्यांनी केले आहेत. ज्यामुळे ते नेहमीच चर्चेतही राहिले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उकंडे यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र जाहिर करून त्यात म्हटल आहे की, ''प्रहार जनशक्ती पक्षाचा अकोट शहर अध्यक्षपदी कार्यरत आहे. मागील ८ वर्षापासून प्रहार तनमनधनाने करीत आहे. बच्चू कडू यांचे कार्य, विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे तसेच प्रहार जनशक्ती पक्ष हा गावपातळी पर्यंत पोहचविण्याचे कार्य आजवर सुरु होते.'' (Latest Marathi News)
ते म्हणाले, ''रुग्णसेवा असो किंवा दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेले कार्य, त्यात खुप समाधान मिळाले, आजवर अनेक आंदोलन असो किंवा जनसामान्याचे प्रश्न सोडविताना अनेक शासकीय गुन्हे नोंदविले गेले. पण त्याविषयी सुद्धा अभिमान वाटतो.''
राजीनामा पत्रात त्यांनी पुढे म्हटल आहे की, मागील २ वर्षापासून प्रहार पक्षात स्थानिक पातळीवर अंतर्गत डावपेच, कलह निर्माण होत आहेत. गटबाजी, वरिष्ठ पदाधीकारी यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे, अशा विविध गोष्टींसाठी सध्या पक्षात काम करणे कठीण झाले आहे. सध्याचा अकोट शहरातील प्रहार पक्ष हा बच्चू कडू यांच्या विचारांच्या विरुद्ध दिशेने स्थानिक पदाधिकारी नेत आहे. त्यामुळे आपण त्यांच्या विचाराची पायमल्ली होत असतानां शांत बसने उचित वाटत नाही. म्हणून अकोट शहर अध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.