Police officer faces action after alleged misconduct with woman inside station lockup. 
महाराष्ट्र

खाकीने ओलांडली मर्यादा! पोलीस ठाण्यातच ASI कडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हादरवणारा व्हिडिओ समोर

Akola Crime : एका एएसआय अधिकाऱ्याने कोठडीत असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. एका एएसआय अधिकाऱ्याने कोठडीत असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.

Bharat Jadhav

  • अकोल्यातील पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार

  • एएसआयवर गंभीर गैरवर्तनाचा आरोप

  • वरिष्ठांकडून कारवाई सुरू

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे, मात्र याचा विसर पोलिसांना पडलाय, का असा प्रश्न अकोल्यातील घटनेतून उपस्थित होत आहे. पोलीस ठाण्याच्या लॉकअप'मधील आरोपी महिलेकडं एका 'ASI पोलिस अधिकाऱ्याने' शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ASI पोलीस अधिकाऱ्याने आरोपी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. संबंधित 'एएसआय'च्या कानशिलात देखील मारण्याचा प्रयत्न वरीष्ठ अधिकाऱ्याने केलाय, मात्र तो पोलीस वर्दीवर असल्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी उगारलेला हात मागे घ्यावा लागलाय.

या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आक्रमक होत संबंधित 'एएसआय'च्या कानशिलात देखील मारण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र तो पोलीस वर्दीवर असल्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी उगारलेला हात मागे घ्यावा लागला. मात्र, 'वर्दी घातलीस तू, असं कृत्य करताना लाच कशी वाटत नाही', असा सवाल वरिष्ठांनी या ASI ला केलाय. हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

हाच व्हिडिओ आता 'साम'च्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ अर्थातच प्रकार आहे अकोला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअप मधील. काल सायंकाळी सुमारे साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडलीये. अकोला पोलिसांची मान शरमेने खाली जाईल, अशी घटना घडली आहे.

80 लाखाच्या आर्थिक पासून प्रकरणात अटकेत असलेली महिलेला सिव्हिल पोलीस ठाण्याच्या लॉकअप ठेवण्यात आलं होतं. या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एसआय राजेश जाधव नामक पोलीस अधिकाऱ्याने या आरोपी महिलेला तुझ्या मुलीच वय काय? 10 हजार रुपये देतोय रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुमळे या ठिकाणी दाखल झाले.

संबंधित महिलेच म्हणणं ऐकून घेतलं, आणि अशा स्वरूपाची मागणी करणाऱ्या एएसआयच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न देखील प्रयत्न केलाय. मात्र या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु झालीय.

थोड्या वेळातच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसावर निलंबनाची कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, या घटनेनंतर पोलीस ठाण्यातचं महिला असुरक्षित असल्याचं चित्र आहेय. त्यामुळे महिला सुरक्षेतेचा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोये. एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीवर आपण पाहत आहोत.

आरोपी पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे संभाषण

महिला : पोलिसाने शिवीगाळ केल्याचा आरोप.

(ASI) पोलिस : मी शिव्या दिल्या का तुला. फालतू काही करू नको, बोलू नको.

वरिष्ठ पोलिस : थांबाहो आवाज नाही.. तिला बोलू द्या.

महिला : मला विचारलं तुझ्या मुलीचं वय किती आहे. म्हटलं 27 आहे. अशा वयाच्या मुली छान आहे.. 10 हजार देतोय.. पाठव म्हणे...

(ASI) पोलिस : मी असे एक शब्द बोललो का? सांग यांना..

# उपस्थित महिला पोलिस कर्मचारी : माझ्यासमोर नाही बोलले नंतर असेल तर माहिती नाही मला.

# महिला : दहा हजार देतो एक रात्री तुझ्या मुलीला पाठव.. साहेब मी गुन्हा केलाय माझ्या मुलीने नाही केला.

# वरिष्ठ पोलिसांना फोनवर माहिती देतांना : जय हिंद सर, PI जुमळे बोलतो. सायबरची आरोपी महिला आहे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये. हा गार्डवर असलेला ASI म्हणतो तिला म्हणतो तुझ्या मुलीचं वय काय, 10 हजार रुपये देतो, रात्रभर माझ्याकडे पाठव. हा ASI आहे राजेश जाधव. कुठला आहे तू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: टॅनिंग कमी करुन 3 दिवसात मिळवा ग्लोईंग फेस, वापरा 'हा' होममेड स्पेशल फेस मास्क

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

Lockdown News : इराण युद्धामुळे भारतात लॉकडाऊन लागणार? व्हॉट्सॲपवरील 'तो' मेसेज किती खरा? वाचा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

SCROLL FOR NEXT