Akola News Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : पाणी भरताना पाय घसरल्याने झाला घात; मोटारीला स्पर्श होऊन विजेच्या झटक्याने महिलेचा मृत्यू

Akola News : नळाला पाणी आल्यानंतर त्यावर पाण्याची मोटर सुरू असताना त्याला हात लावताय? तर सतर्कता बाळगा. कारण अकोल्यात नळाचे पाणी भरताना विजेचा धक्का लागून एका महिलेला आपला जिव गमवावा लागला आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आल्यानंतर घराच्या नळाला पाणी आले. यामुळे महिलांची पाणी भरण्यासाठी धावपळ सुरु होती. याकरिता इलेक्ट्रिक पाण्याची मोटार लावली होती. मात्र मोटार सुरु असताना पाणी भरत असताना मोटारीला स्पर्श झाला. यात विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने विजेचा जोरदार झटका बसून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अकोला शहरात आज दुपारच्या सुमारास घडली आहे. 

अकोल्यातल्या डाबकी रोडवरील भीम नगरातही आज अशीच घटना घडली असून संगीत शिरसाठ या महिलेचा मृत्यू झाला आहे. नळाला पाणी आल्यानंतर त्यावर पाण्याची मोटर सुरू असताना त्याला हात लावताय? तर सतर्कता बाळगा. कारण अकोल्यात नळाचे पाणी भरताना विजेचा धक्का लागून एका महिलेला आपला जिव गमवावा लागला आहे. अकोल्यात नळाचं पाणी भरत असताना नळ्यातील पाण्याचा फोर्स वाढवण्यासाठी नळावर घरोघरी पाणी मोटर लावल्या जातात. यामुळेच दुर्घटना घडली आहे. 

पाणी भरताना घसरला पाय 

अकोल्यातल्या डाबकी रोडवरील भीम नगरातही आज अशीच घटना उजेडात आली आहे. दुपारच्या वेळी भीमनगरात महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावेळी संगिता शिरसाठ यांनी नळावरील पाणी मोटर सुरु केली. संगीता यांचा घरात पाणी भरत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल जात पाण्याच्या मोटरला स्पर्श झाला. त्यामुळे संगीता यांना जोरदार विजेचा झटका बसला. 

क्षणात झाले होत्याचे नव्हते 

पाणी भरण्यासाठी सुरु असलेल्या पाण्याच्या मोटारीवर संगीता या पडल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. विजेच्या जोरदार शॉक लागल्यामुळे त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. संगीताच्या मृत्यू पश्चात पती आणि एक मुलगा, एक मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT