Akola Accident Saam Tv
महाराष्ट्र

Akola Accident: भरधाव डंपरने महिलेला चिरडले, दोन्ही पायांवरून गेले चाक; अपघाताचा थरारक CCTV

Akola Accident CCTV: अकोला शहरातील मुर्तीजापूर मार्गावर आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावरील मूर्तिजापूर रस्त्यावरील महाकाली हॉटेलजवळ डंपरने सायकलवरून जाणाऱ्या महिलेला धडक दिली.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यामध्ये भरधाव डंपरने महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या दोन्ही पायांवरून डंपर गेला. अकोला शहरातील मुर्तीजापूर मार्गावर ही घटना घडली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खदान पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील मुर्तीजापूर मार्गावर आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावरील मूर्तिजापूर रस्त्यावरील महाकाली हॉटेलजवळ डंपरने सायकलवरून जाणाऱ्या महिलेला धडक दिली. महिला डंपरच्या पुढच्या चाकाखाली आली. महिलेच्या दोन्ही पायांवर डंपरचे चाक गेले. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. महिलेच्या दोन्ही पायांवरून डंपरचे चाक गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चालकाने अचानक डंपर वळवल्यामुळे महिला चाकाखाली आली.

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिलेचे नाव समोर आले नाही. महिलेचं दोन्ही पाय या अपघातामध्ये निकामी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना हॉटेल महाकालीवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या अपघातप्रकरणात खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. डंपरसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT