Akola News Saam TV
महाराष्ट्र

अंत्यसंस्कारला घेऊन जात असताना तरुण अचानक तिरडीवरुन उठला; अकोल्यातील विचित्र घटना

अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार उघडकीस आला आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील (Akola) पातूर तालुक्यातल्या विवरा गावात एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. एक तरुण मयत झाला म्हणून त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला घेऊन जात असतानाच तो चक्क तिरडीवरून उठून बसल्याची घटना समोर आली आहे.

प्रशांत मेसरे असं मयत झालेल्या आणि मध्येच तिरडीवर उठणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत झाला असे सांगत त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची (Funeral) तयारी करून त्याला स्मशानभूमीत नेत असताना तरुणामध्ये हालचाल जाणवली अंत्यसंस्कार यात्रा थांबवतच हा तरुण उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दरम्यान हा प्रकार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना (Police) यावेळी पाचारण करण्यात आले होते. हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान पोलिसानी त्या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर त्या तरुणावर काळी जादू केल्याचे कुटुंबानी दावा केला आहे.

दरम्यान, प्रशांतचा मृत्यू झाला म्हणून त्याच्या मित्रांनी मिस यू प्रशांत असे स्टेटस देखील ठेवले होते. या सर्व विचित्र घटनेमुळे मात्र, नागरिकांना एखाद्या सिनेमामधील थरारक दृश्याची आठवण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT