Akola News
Akola News Saam tv
महाराष्ट्र

सेल्फी काढण्याचा मोह बेतला जीवावर; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जयेश गावंडे

अकोला : खदानमध्ये असलेले पाणी पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. या मोहापायी जीव गमावल्याची घटना अकोल्यातील नशिवणी रेल्वेस्टेशन नजिकच्या कोठारी खदानमध्ये घडलीय. (akola news The temptation to take a selfie unfortunate death of a young man)

अकोल्यातील (Akola) हर्ष बोचरे (वय २०) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शोध कार्य करत असलेल्‍या पथकाला रात्री माहिती मिळाली होती. यावरून पथकाने रेस्क्यु बोटद्वारे सर्च ऑपरेशन चालु केले. यावेळी खदानीत कुठे 15 फुट तर कुठ 25 ते 30 फुट खोल पाणी व कपारी होत्या. त्यात अंधार असल्याने सर्च ऑपरेशनला अडथळे निर्माण होत होते.

पाच तासानंतर मृतदेह बाहेर

संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अथक प्रयत्नानंतर खदानमधून युवकाचा मृतदेह शोधून काढला. शेवटी पाच तासानंतर युवकाचा मृतदेह रेस्क्यु टीमने शोधुन बाहेर काढला. दरम्यान खदान परिसराला पाहून सेल्फी काढण्याच्या मोहापायी जीव गमावल्याची माहिती आहे. मृतदेह शोधण्यासाठी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या पथकाने मेहनत घेतली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

SCROLL FOR NEXT