Suicide Case Akola News Saam tv
महाराष्ट्र

नीट परीक्षेत दुसऱ्यांदा अपेक्षेपेक्षा कमी गुण; तरुणीचा टोकाचा निर्णय

नीट परीक्षेत दुसऱ्यांदा अपेक्षेपेक्षा कमी गुण; तरुणीचा टोकाचा निर्णय

जयेश गावंडे

अकोला : दुसऱ्यांदा दिलेल्या नीट (NEET) परीक्षेच्या निकालात अपेक्षाप्रमाणे गुण न मिळाल्याने एका तरुणीने टोकाचा निर्णय घेतला आहे. अकोल्यातील (Akola) रोहिणी विलास देशमुख असं मृतक तरुणीचे नाव आहे. अकोला शहरातील मध्य भागात असलेल्या मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Akola News Suicide Case)

दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी लाखो उमेदवार नीट परीक्षेला (NEET Exam) बसतात. नीट परीक्षा खूप कठीण राहते. राज्यात नीट परिक्षेतील अपयशाच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, कमी गुण मिळाल्‍याने अकोल्यात रोहिणी विलास देशमुख या तरुणीने आत्महत्या (Suicide) केली. शहरातील मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत तिने जीवन संपवले आहे. यापुर्वी रोहिणीने नीट परीक्षा दिली होती. मात्र, तिला या परीक्षेत ३५० च्या जवळपास गुण मिळाले होते. आता यंदा दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात तिला ४२० गुण मिळाले. रोहिणी ओपन प्रवर्गातून येत असल्याने तिला ५६५ च्यावर गुणाची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षाप्रमाणे तिला कमी गुण मिळाल्याने रोहिणी या तणावात होती.

पहाटे पाचलाच उठून गेली बाहेर

काल रात्री नियमितप्रमाणे रोहिणीने कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपून गेले. मात्र आज पहाटे ५ वाजता झोपेतून उठून बाहेर पडली नाही अन् या तणावातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला. तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयानंतर कुटुबांला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वडीलांचे स्वप्‍न राहिले अधूरे

दरम्यान, रोहिणीचे वडील राजस्थानमध्ये राहतात. ती तिच्या मामाकड़े अकोल्यात राहायची. वडिलांसह कुटुंबाचे रोहिणी डॉक्टर व्हावे असे स्वप्न होते. मात्र आपण कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करू शकली नाही. दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात यश आले नाही. वैद्यकीय क्षेत्रात काम करत बेटी बचाव या उपक्रमांतर्गत तिला अनेक काम करायचेही स्वप्न होती. दरम्यान, दरवर्षी अनेक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. नीटच्या माध्यमातून घेतलेल्या प्रवेश परीक्षेद्वारे, विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासह इतर अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. रोहिणी देखील याची तयारी करीत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT