School Van Accident Saam tv
महाराष्ट्र

School Van Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या व्हॅनला भीषण अपघात; समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी

Akola News : विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी व्हॅन मार्गस्थ झाली होती. याच वेळी बाळापूरकडून वाशिमकडे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रकने विद्यार्थी बसलेल्या स्कूल वाहनाला जोरदार धडक

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. समोरून आलेल्या ट्रकने व्हॅनला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून यात व्हॅनमध्ये बसलेले १० विद्यार्थी जखमी झाले असून यातील तीन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. 

अकोल्यातल्या पातुर- बाळापूर रस्त्यावरील वाडेगाव जवळ हा अपघात सकाळी झाला. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी व्हॅन मार्गस्थ झाली होती. याच वेळी बाळापूरकडून वाशिमकडे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रकने विद्यार्थी बसलेल्या स्कूल वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकमध्ये जवळपास २० टन लोड असल्याचे समजते. यामुळे स्कूल व्हॅनचा समोरील भाग दबला गेला आहे. 

तीन विद्यार्थी गंभीर जखमी 

या अपघातात स्कूल व्हॅनमधील जवळपास दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर यापैकी तीन विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी आहेत. अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी लागलीच धाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संतप्त पालकांचा रास्ता रोको 
अपघातानंतर संतप्त नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. वाडेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्दळ राहत असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात यावा, तसेच वाहतूक पोलीस कार्यरत करण्यात यावे; अशा मागणीसाठी या गावकऱ्यांचा रास्ता रोको सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

मुसळधार पावसाने उडवली धांदल; यवतमाळ-बुलढाणा-वाशिममध्ये पूरसदृश्य स्थिती

SCROLL FOR NEXT