Prakash Ambedkar Saam tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : ओला दुष्काळ जाहीर करायला वेळ का?; दुष्काळाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा

Akola News : महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करण्यातही आपली कोणतीही हरकत नाहीय. तर आंबेडकर बंधू एकत्र येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: राज्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना ओला दुष्काळ जाहीर करण्यात वेळ का लावताय? ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाय योजनांना परवानगी देऊ शकत नाही. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही; असा नियम सांगत सरकारचे सर्वेक्षण आणि इतर कोणत्याच गोष्टी झालेल्या नसतांना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. अकोला येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावतात? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. 

नाव न घेता ठाकरेंवर निशाणा 
दरम्यान, सातबारा कोरा करण्याच्या राजकीय पक्षांच्या मागणीवर देखील आंबेडकरांनी सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे.‌ कारण आता कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांनी ते मुख्यमंत्री असतांना काय केलं?, असा सवाल करीत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली.

भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत जाणार 
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणाचीही स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिली असल्याचं ते म्हणाले. महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करण्यातही आपली कोणतीही हरकत नसल्याचं ते म्हणालेय.

आंबेडकर बंधू एकत्र येण्यात अडचण नाहीच 
जसे ठाकरे बंधू एकत्र आले तसेच आंबेडकर बंधू एकत्र येण्याच्या आनंद आंबेडकरांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलीये. आंबेडकर बंधू एकत्र येण्यास कोणतीही अडचण असल्याचे प्रकाश आंबेडकर हे म्हणाले. या प्रक्रियेतील काही गोष्टी कौटुंबिक पातळीवर झालेल्या चर्चेतील असल्यामुळे त्या सांगण्यात त्यांनी नकार दिला. तर मतचोरीच्या नव्हे तर सर्वच मुद्द्यावर राहुल गांधींसोबत एकत्र यायला हरकत नसल्याचं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेणमध्ये दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संताप, व्हिडिओ व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, डीजे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीपातळी ९५.८९ टक्क्यांवर , सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

SCROLL FOR NEXT