Nitin Deshmukh Rahul Narwekar Saam tv
महाराष्ट्र

Nitin Deshmukh : लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज; राहूल नार्वेकरांवर आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप

Akola News : मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शरीरसुखाची मागणी केली. त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी आमदार नितीन देशमुख यांचे ठिय्या आंदोलन

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: कार्यालयातील महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. या मुद्यावर लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती. मात्र या संपूर्ण प्रकारणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप बाळापूरच्या आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. 

अकोल्यातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यलयात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेल्या दोन तासापासून आमदार देशमुख यांचं ठिय्या सुरु असून यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असावेत; कारण, असे आरोपी असलेले अधिकारीच सांगत असल्याचे स्पष्टपणे देशमुख म्हणाले. 

त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी 

मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी डि. बी. कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे या दोघांनाही पदावरून बडतर्फ करण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार नितीन देशमुख यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान, अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता, एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यात ठिय्या आंदोलन केल्याचे आमदार नितीन देशमुख म्हणाले.

अधिकाऱ्यांना मतदार संघातील आमदारांचे पाठबळ 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महिला कम्प्युटर ऑपरेटर हिने ज्यांच्यावर आरोप केले; त्या कपिले यांच्यामागे मुर्तीजापुर मतदार संघाचे आमदाराचे पाठबळ असल्याचा आरोप केला आहे. आपल्याला वारंवार तक्रारी करूनही पैशांमूळे कुठेच न्याय मिळाला नसल्याचा आरोप पिडीत महिलेने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT