Akot Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Akot Heavy Rain : अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतात पाणी साचल्याने नुकसान

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पावसाचे आगमन झाले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी रात्री पुन्हा मुसळधार पाऊस बरसला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : मागील पंधरवड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून अकोट तालुक्यातील काही भागात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे रस्त्यावर व शेतांमध्ये देखील पाणी साचले आहे. 

अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पावसाचे आगमन झाले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी रात्री पुन्हा मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसला आहे. दरम्यान या पावसामुळे अकोट तालुक्यातल्या रुईखेड गावात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या प्रचंड हाल होत आहेत. रुईखेड गावात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने रात्रभर ग्रामस्थांचे हाल झाले. 

गावातील रस्त्यानं नदीचे स्वरूप 

दरम्यान आज पहाटे पावसाने विश्रांती घेतली, मात्र गावातल्या रस्त्यावर अक्षरशः पावसाचे पाणी वाहत झाले. या रस्त्याला जणू नदीचे स्वरूप आल्याचे दिसत आहे. तर शेत शिवारात देखील देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे. त्याचा फटका पिकांना बसला असून त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT