Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News: वडीलाचे निधन झाल्‍याने परिवार अंत्यविधीसाठी गावी; संधी पाहून चोरट्यांनी मारला डल्ला

वडीलाचे निधन झाल्‍याने परिवार अंत्यविधीसाठी गावी; संधी पाहून चोरट्यांनी मारला डल्ला

जयेश गावंडे

अकोला : वडिलांचे निधन झाल्‍याने घरातील मंडळी अंत्यविधीसाठी गावाकडे गेले होते. परिवार गेल्याची संधी (Akola News) पाहून चोरट्यांनी घरावर डल्ला मारला. श्रीकांत लड्डा हे १२ एप्रिलला अंत्यसंस्कार करण्याकरता घर बंद करून गेले होते. (Live Marathi News)

अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सहकारनगरात श्रीकांत हरिकिसन लड्डा यांच्या श्रीहरी निवासस्थानावर चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. श्रीकांत लड्डा हे अमरावती जिल्ह्यातील कोकर्डा या ठिकाणी वडीलांचे निधन झाल्यामुळे घरातील मंडळी अंत्यविधीसाठी (Funeral) गेले होते. श्रीकांत लड्डा हे १२ एप्रिलला अंत्यसंस्कार करण्याकरता घर बंद करून गेले होते. या दरम्‍यान १३ व १४ एप्रिल या दोन दिवसाच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घराचा कोंडा तोडून श्रीहरी बंगल्यामध्ये प्रवेश केला.

२५ लाखाचा मुद्देमाल लंपास

दरम्‍यान चोरट्यांनी अंदाजे वीस तोळे सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घरकाम करणाऱ्या बाईला दरवाजा उघडा आणि तुटलेला असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती श्रीकांत लड्डा यांना दिली. या घटनेची माहिती खदान पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पुढील तपास खदान पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : प्रेमाने नाती जोडवा, ५ राशींच्या व्यक्तीची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

SCROLL FOR NEXT