Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : क्रूरतेचा कळस! पाय बांधत कुत्र्याला बेदम मारहाण, डोळेही फोडले; पोलिसांत गुन्हा दाखल

Akola News : चार जणांच्या मदतीने त्याने कुत्र्याचे पाय बांधले. यानंतर लाठीकाठीने बेदम मारहाण केली.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: शेजारच्या घरातला कुत्रा भुंकतो याचा राग मनात धरून कुत्र्याला निर्दयीपणे मारहाण केल्याचा प्रकार अकोला येथे समोर आला आहे. सोनू देशमुख नावाच्या व्यक्तीने चार जणांच्या मदतीने एका पाळीव कुत्र्याचे चारही पाय बांधून बेदम मारहाण तर केलीच शिवाय त्या कुत्र्याचे दोन्ही डोळेही निकामी केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अकोल्यातल्या (Akola) तापडिया नगर भागात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. येथील रहिवासी सुनिता सोनोने या महिलेने कुत्रा पाळला होता. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सोनू देशमुख याने कुत्र्याचा सततचा भुंकण्याचा आवाज कानावर पडतो. म्हणून कुत्र्यासोबत भयंकर कृत्य केले. चार जणांच्या मदतीने त्याने कुत्र्याचे पाय बांधले. यानंतर लाठीकाठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर या कुत्र्याला बांधलेल्या अवस्थेत कचऱ्याच्या गाडीत टाकून दिले. या कुत्र्याचा इतका छळ करण्यात आला की एकदाही कुत्र्याला होणाऱ्या वेदनांबद्दल मारेकऱ्यांनी विचार केला नाही. 

पोलिसांत गुन्हा दाखल 

या संपूर्ण प्रकरणात रामदास पेठ (Police) पोलिसांनी मारेकरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सद्यस्थितीत या कुत्र्यावर अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र मारहाणीत कुत्र्याचे दोन्ही डोळे निकामी व कंबर फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्या अंगावर अनेक जखमा झाल्याचंही डॉक्टराचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

SCROLL FOR NEXT