Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: साईड देण्यावरून वाद; एसटी बस चालकाला खासगी बस चालकाकडून मारहाण

साईड देण्यावरून वाद; एसटी बस चालकाला खासगी बस चालकाकडून मारहाण

अॅड. जयेश गावंडे

अकोला : शेगाव येथून यवतमाळ येथे जात असताना शेगाव आगाराच्या बस (St Bus) चालकाला साईड देण्याच्या कारणावरून वाद झाला. यात खामगाव येथील स्वामी ट्रॅव्हल्स खाजगी बस चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना (Akola) अकोल्यातील बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. (Maharashtra News)

साईड देण्याच्या कारणावरून एसटी बस अडवून मारहाण झाली. त्याचा व्हिडीओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. (Shegaon) शेगाव आगाराची बस प्रवाशी घेऊन यवतमाळकडे निघाली होती. दरम्यान लक्झरी बस चालक हा एसटी बसला हटकून पुढे जाण्यासाठी साईड देत नव्हता. यानंतर ट्रॅव्हल्सची खाजगी बस जवळ फाट्यावर प्रवाशी उतरविण्यासाठी फाट्यावर थांबल्याने एसटी चालकाने आपली बस पुढे नेली. मात्र बस पुढे का नेली असे म्हणून बस अडवून दोघांनी चालक योगेश गोंडोकार यांना जबर मारहाण करण्यात आली.

बस चालक जखमी

एसटी बस चालकाचा एक डोळा जायबंदी झाला असून डोक्याला मार लागलेला आहे. त्यामुळे गंभीर जखमी एसटी बस चालकाला अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी बाळापूर (Police) पोलिसांनी लक्झरी बस चालकावर व वाहकावर गुन्हे दाखल केले. मात्र याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करीत नसल्याने आपण पोलीस अधीक्षक घुगे यांना ही घटना सांगितल्यानंतर तसे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT