Food Poisoning Saam tv
महाराष्ट्र

Food Poisoning : गुळपट्टी खाण्यातून दिंडीतील भाविकांना विषबाधा; शेगाव येथून परतल्यानंतर झाला त्रास

Akola News : बाळापूर तालुक्यातील हिंगणा नळकांडे गावातून शेगाव संत गजानन महाराजांचे दर्शनासाठी पायदळ दिंडी वारी निघाली गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाला शेगावरून रवाना झाले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अनेक भाविक हे शेगाव येथे पायी दिंडी घेऊन दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील हिंगणा नळकांडे येथील काहीजण पायदळ वारी करत शेगावला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना रस्त्यात गुळपट्टी खाल्ली. यानंतर ३० ते ३५ जणांना उलट्या व मळमळचा त्रास जाणवू लागला होता. गुळपट्टी खाण्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हिंगणा नळकांडे गावातून शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे दर्शनासाठी पायदळ दिंडी वारी निघाली होती. शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी वारी पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला शेगावरून रवाना झाले. हिंगणा गावाकडे पायीच येत असताना वाटेत थोडा आराम करत दिंडी जात असताना वाटेतच काही दिंडीतील वारकऱ्यांनी एका ठिकाणी गुळपट्टीचा आस्वाद घेतला. 

आरोग्य पथक गावात दाखल 

या दरम्यान दिंडीतील ३० ते ३५ जणांनी गुळपट्टी खाल्ली तर पाणी देखील प्यायले. त्यामुळे या सर्वाना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या असा प्राथमिक अंदाज लावला जातोय. तर काल रात्री उशिरा मळमळ आणि उलट्या होऊ लागल्याने विषबाधा झाल्याचे लक्षात आले. याबाबत आरोग्य यंत्रणेला माहिती मिळाल्यानंतर तातडीने बाळापूर येथील आरोग्य पथकाने हिंगणा गावात हजेरी लावली. येथील ग्रामस्थांवर प्राथमिक उपचार करत काहींना सलाईन देखील लावण्यात आल्या होत्या. 

सर्वांची प्रकृती स्थिर 

आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाले असून सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर जवळपास दहा ते पंधरा जणांवर अद्यापही बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुळपट्टी खाण्यातून विषबाधा झाल्या असल्याचे बोलले जाते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT