महाराष्ट्र

Akola News: अकोला राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार, बघता बघता पूर्णतः जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली, पाहा VIDEO

Akola Car Fire: अकोल्यामध्ये भरधाव कारने अचानक पेट घेतला. बघता बघता संपूर्ण कार जळून खाक झाली. या कारमधून दोघे जण प्रवास करत होते. वेळीच ते कारमधून बाहेर पडले त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या बर्निंग कारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर मार्गावर बोरगाव मंजुजवळ आज संध्याकाळी सहाच्या सुमारास 'द बर्निंग' कारचा थरार पाहायला मिळाला. मुर्तीजापुरकडून अकोल्याकडे येत असलेल्या कारला एकाएकी आग लागल्याने कारने पेट घेतला. त्यावेळी सुदैवाने चालक आणि इतर एका व्यक्तीने सतर्कता बाळगत कार रस्त्यालगत उभी करत उडी घेतल्याने जीवितहानी टळली. शॉर्टसर्किटमुळे कारला ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत कार पूर्णपणे जळून भस्मसात झाली.

अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील बोरगावमंजूजवळ कारने पेट घेतला. आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली अकोल्यावरून अमरावतीकडे जात असताना या कारमधून अचानक धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आलं. चालकाने तातडीने कार महामार्गलगत उभी केली आणि कारमधील सर्व जण खाली उतरले. स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र बघता बघता आगीची तीव्रता वाढली अन् आगीने पूर्ण कार जळून खाक झाली.

आगीच्या घटनेत कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र हा बर्निंग कारचा थरार अर्धा तास सुरू होता. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आगीत कार पूर्णता जळून खाक झाली. या आगीमुळे कारचं मोठं नुकसान झालं. कारच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT