Akola Accident Saam tv
महाराष्ट्र

Akola Accident : अकोल्याजवळ भीषण अपघात; सातजण गंभीर जखमी

Akola News : अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवनी परिसरात हि घटना घडली आहे. सकाळी लोडेड ट्रक व मालवाहू बोलेरो गाडीची सामोरा समोर धडक झाली

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यातून गेलेल्या महामार्गावर आज सकाळी भरधाव ट्रक व प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. 

अकोल्यातल्या (Akola) राष्ट्रीय महामार्गावरील शिवनी परिसरात हि घटना घडली आहे. सकाळी लोडेड ट्रक व प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीची सामोरा समोर धडक झाली. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की ट्रक आणि बोलोरो वाहन रस्त्यावर पलटी झाले. समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रकमधील पॅकिंग पेपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सातजण गंभीर जखमी झाले आहेत. या सातही जखमी रुग्णांवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

महामार्गावर वाहतूक ठप्प 

ट्रक व बोलेरो गाडीचा अपघात झाल्याने दोन्ही गाड्या महामार्गावर पलटी झाल्या होत्या. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येत अपघाती वाहनांना रस्त्याच्या बाजूला करत वाहतुकीचा मार्ग सुरळीत केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT