बालिका HIV बाधा प्रकरण; सखोल चौकशीचा अहवाल आज पाठवला जाणार SaamTv
महाराष्ट्र

बालिका HIV बाधा प्रकरण; सखोल चौकशीचा अहवाल आज पाठवला जाणार

उपचारादरम्यान एचआयव्ही HIV बाधीत रक्तपुरवठा झाल्यामुळे आठ महिन्यांची एक चिमुकली अकोल्यातील मूर्तिजापुरात एचआयव्ही बाधीत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

जयेश गावंडे

अकोला : उपचारादरम्यान एचआयव्ही HIV बाधीत रक्तपुरवठा झाल्यामुळे आठ महिन्यांची एक चिमुकली अकोल्यातील मूर्तिजापुरात एचआयव्ही बाधीत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आज या प्रकरणी एफडीए आणि केंद्रीय पथकाकडून बी.पी. ठाकरे रक्तपेढीची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनंतर सखोल चौकशी अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक वंदना वसू यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

अकोल्यातील मूर्तिजापूर येथील अवघाते हॉस्पीटल मध्ये तालुक्यातील हिरपूरच्या एका 8 महिन्यांच्या चिमुकलीवर उपचार सुरू होते. तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे अकोल्याच्या बी.पी.ठाकरे रक्तपेढीतून मागविण्यात आलेले रक्त तिला देण्यात आले होते. त्यानंतरही तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे तिला अमरावतीच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथील तपासणीत तिचा एचआयव्ही अहवाल पॉझीटीव्ह आला. तिच्या आई-वडीलांचा, मात्र निगेटीव्ह आला. त्यामुळे एच आय व्ही बाधीताचे रक्त देण्यात आल्यामुळे ही चिमुकली बाधीत झाल्याची शंका बळावली.

दरम्यान, काल या प्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. कालपासून या प्रकरणी चौकशी सुरू असून काल आरोग्य विभागाने या प्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल शासनाकडे पाठवला असून या अहवालात कुणीच तांत्रिक दृष्ट्या दोषी नसल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकरणी मुंबई येथील एफडीएची टीम सखोल रक्तपेढीची सखोल चौकशी करीत आहे. तसेच दिल्ली येथील सेंट्रल टीम सुद्धा अकोल्यात दाखल झाली असून ते सुद्धा रक्तपेढीची सखोल चौकशी करत आहेत.

त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यानंतर आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकाऱ्यांची बैठक आहे. या बैठकीनंतर सखोल चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्राथमिक अहवालात कोणी दोषी नसेल तर आठ महिन्यांची बालिका एचआयव्ही बाधित का झाली? असा प्रश्न निर्माण झालाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राणा सूर्यवंशी यांना मोठा झटका, Y+ सुरक्षा हटवली

Shocking : भीषण दुर्घटना! हॉटेलमध्ये ४ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

New Rules: गॅस सिलिंडरपासून ते बँकिंगपर्यंत...; आजपासून ८ नियम बदलले, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: 'तू दाखवून दिलं की तू कोणाशीचं लॉयल नाही'; वीकेंड का वारमध्ये स्काउटवर सलमान खान भडकला

Bank Robbery : SBI बँकेत सशस्त्र दरोडा! बडतर्फ PSI निघाला मास्टरमाईंड; जेलमधून रचला कट

SCROLL FOR NEXT