Election officials announce by-election schedule for vacant sarpanch and member posts in Akola district. Saam Tv
महाराष्ट्र

धुरळा उडाला! १३ सरपंच आणि १२६ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

Akola Gram Panchayat By Election Full Schedule 2026: अकोला जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींमध्ये १३ सरपंच व १२६ सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामनिर्देशन, मतदान आणि निकालाच्या तारखा जाणून घ्या.

Omkar Sonawane

राजीनामा, निधन, अपात्र इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंच पदांच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतीतील १३ थेट सरपंच पदे आणि १२६ रिक्त सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या अनुषंगाने आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन व्हावे आणि निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.

कार्यक्रमानुसार, तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची तारीख ३० मार्च आहे. नामनिर्देशनपत्रे दि. ७ ते १३ एप्रिल या काळात (शनिवार आणि रविवार वगळून) सकाळी १ ते दुपारी ३ या वेळेत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून होईल. दि. १७ एप्रिल रोजी दु. ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल.

निवडणूक चिन्ह नेमून देणे, तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी दि. १७ एप्रिलला दुपारी ३ नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यक असल्यास मतदान दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी आणि निकाल दि. २९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना दि. ६ मे रोजी प्रसिद्ध होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोन्याच्या भावात अचानक मोठी उलथापालथ! आठवड्यात सोनं तब्बल ₹३,४४० ने स्वस्त; पाहा १८, २२ अन् २४ कॅरेटचे नवे दर?

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT