Akola Fire News Saam tv
महाराष्ट्र

Akola Fire News : कचरा जाळल्याने चारचाकी गाड्यांना आग; दोन गाड्यांचे मोठे नुकसान

Akola News : अकोला शहरातील अकोला- खामगाव रस्त्यावर ओंमकार रीजन्सीजवळ चारचाकी वाहनांचे सेंटर असून येथे चाकी गाड्या मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी येत असतात

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यात कचऱ्याला लावलेल्या आगीमुळे कार सर्व्हिस सेंटरमध्ये लावलेल्या चारचाकी (Akola) गाड्यांना देखील आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन कार पूर्णपणे जाळून गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

अकोला शहरातील अकोला- खामगाव रस्त्यावर ओंमकार रीजन्सीजवळ चारचाकी वाहनांचे सेंटर असून येथे चाकी गाड्या मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी येत असतात. अचानक सर्विस सेंटरमधील कचऱ्याला लागलेल्या (Fire) आगीचा भडका चारचाकी वाहनापर्यंत पोहोचला आणि दोन चारचाकी वाहने क्षणार्थात जळून खाक झाली. काही क्षणातच कचऱ्याने पेट घेतल्यामुळे डिझेलला आग लागली. यामुळे चार चाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ऐन उन्हाळ्यात आगीच्या घटनेत झालेली वाढ पाहता जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ओंमकार रेजन्सीजवळील चारचाकी वाहनाच्या सर्व्हिस परिसरातील कचरा जाळला होता. या आगीत दोन कार पूर्णपणे जळून खाक झाल्या. या आगीच्या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून आग विझविण्यासाठी महानगरपालिकेच्या (Fire Brigade) अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. आग आटोक्यात आणली खरी मात्र तोपर्यत दोनही वाहनांचं मोठं नुकसानं झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Health : ताप-खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका, १५ वर्षांचा मुलगा थेट व्हेंटिलेटरवर, वाचा डॉक्टर काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Maharashtra Politics : "काय म्हणताय धाराशिव?" सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Destination Wedding Places : डेस्टिनेशन वेडिंग प्लान करताय? ही आहेत भन्नाट लोकेशन्स

SCROLL FOR NEXT