Akola : आमदार मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी! SaamTvNews
महाराष्ट्र

Akola : आमदार मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सांगली येथील राष्ट्रवादीच्या सभेत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

जयेश गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सांगली (Sangli) येथील राष्ट्रवादीच्या सभेत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची (Brahmin Community) आणि पुरोहित वर्गाची खिल्ली उडवल्याचा आरोप ब्राह्मण संघटनांकडून होताना दिसत आहे. दरम्यान याचे पडसाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत.

हे देखील पाहा :

अकोल्यात ही आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्याविरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात मिटकरी विरोधात तक्रार दिलीय. ब्राम्हण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल अमोल मिटकरी यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर मानहानी आणि धार्मिक भावना दुखवल्याबद्दल गुन्हा (Case) दाखल करावा, अशी तक्रार यावेळी करण्यात आलीय.

अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आलीय. यावेळी पोलीस स्टेशन परिसरात आमदार मिटकरी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील पासपोर्ट कार्यालय उडवून देण्याची धमकी

पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभेंडीची भाजी कशी बनवायची?

Health News: गॅस, शिंका, जांभई किंवा लघवी थांबवताय? या सवयींमुळे वाढू शकतात गंभीर समस्या

शासकीय कामासाठी मागितली २५ हजाराची लाच; गटविकास अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

Buttermilk Benefits: वजन कमी करण्यासाठी जेवल्यानंतर ताक पिण्याचा डॉक्टर का सल्ला देतात? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT