Akola Dabaki Road Bike Accident Saam TV
महाराष्ट्र

Akola Accident: दुचाकीवरील नियंत्रण सुटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; २४ वर्षीय तरुणीचा दुर्देवी अंत

Akola Accident News: अकोल्यातील डाबकी रोडवरील महालक्ष्मी नगराजवळ सुरू असलेल्या निर्माणधीन पुलावर भरधाव दुचाकीचा अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

Akola Dabaki Road Bike Accident: अकोला जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अकोल्यातील डाबकी रोडवरील महालक्ष्मी नगराजवळ सुरू असलेल्या निर्माणधीन पुलावर भरधाव दुचाकीचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर दुचाकी थेट पुलावर आदळली या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली तरुणी जागीच ठार झाली आहे. (Latest Marathi News)

तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डाबकी रोडकडून शेगावकडे जाणाऱ्या मार्गावर दोन वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. बांधकामात दिरंगाई होत असल्याने, या ठिकाणी सातत्याने अपघातांच्या मालिका घडत आहेत. (Breaking Marathi News)

गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दुचाकीने हातरूण (Akola News) येथे अंकित जानराव डोंगरे (वय २६) आणि त्याची मैत्रिण राणी मंगेश सावंत (२४, रा. छिंडवाडा, ह. मु. शिवणी) हे दोघे जात असताना, भरधाव दुचाकी बांधकाम सुरू असलेल्या पुलावर आदळली. यात राणी सावंत हिचा जागीच मृत्यू झाला.

तर अंकित डोंगरे हा गंभीर जखमी झाला. या घटनेची (Accident) माहिती मिळताच, डाबकी रोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह व जखमी तरुणाला सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: मालेगाव निकालावर देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले... VIDEO

Maharashtra Live News Update: - कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार?

Pimpri Chinchwad Crime : ज्येष्ठ नागरिकाला बांधून बंगल्यात दरोडा; राजस्थानी दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार, प्रायव्हेट फोटो काढून ब्लॅकमेलिंग, काळंनिळं होईपर्यंत मारलं; बीड हादरलं

श्रावणात वांगी का खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT