Youth Stabs Girlfriends Ex Boyfriend Saam Tv
महाराष्ट्र

Akola Crime News: गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर तरुणाचा चाकूहल्ला, भरस्त्यात थरार, पाहा VIDEO

Youth Stabs Girlfriends Ex Boyfriend: एका तरुणीसाठी दोन तरुणांमध्ये वाद झाला. गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर तरुणाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला आहे.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यात एका तरुणावर भररस्त्यात चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तोष्णीवाल लेआउट परिसरात ही घटना घडली. एका तरुणीसाठी दोघांमध्ये हा वाद झाला. गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर तरुणाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

करण थुकेकर या तरुणांने त्याच्या गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर भररस्त्यात चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात करण सावळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. दोघेही कृषी नगर भागातील रहिवासी आहेत. गर्लफ्रेंडच्या कारणांवरून हा चाकूहल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी करण सावळे याचे एका तरुणीवर प्रेम होतं. त्यांच्यामध्ये वाद झाल्यावर तिने करण सावळेची साथ सोडली. त्यानंतर तिचे आरोपी करण थुकेकर याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले.

रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जखमी करण सावळे हा त्याचा मित्र शिवा शर्मा याच्यासोबत तोष्णीवाल लेआउट परिसरात जात होता. त्यावेळी आरोपी करण थुकेकर आणि त्याचा मित्र बाईकवर आले. त्यानंतर करण थुकेकर म्हणतो की 'मागे तू वाचला आता तुला दाखवतो' आणि सोबत आणलेला चाकू काढून करण सावळेवर हल्ला करू लागतो. करणने थेट आपल्या गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर म्हणजेच करण सावळे याच्या डोक्यावर आणि पोटावर चाकूने वार केले.

या हल्ल्यामध्ये करण सावळे जखमी होतो. कशी तरी तो करण थुकेकरच्या तावडीतून स्वत:ची सुटका करतो आणि पळ काढतो. आरोपी त्याचा पाठलाग करत पुन्हा त्याच्यावर चाकूहल्ला करत त्याला जखमी करतो. या हल्ल्यात करण सावळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेनंतर दोन्हीही आरोपी बाईकवरून पळून गेले होते. पण पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्यांना अटक केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT