Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : घरगुती मेसच्या नावाखाली देहविक्री; अकोल्यात नागरिकांनी उघडकीस आणला धक्कादायक प्रकार

Akola News : अकोल्या शहरातील मोठी उमरी भागातील उच्चभ्रू वस्तीत हा देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. घरगुती जेवणाच्या मेसच्या नावाखाली हा संपूर्ण गोरखधंदा चालवला जात होता

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यातील मोठी उमरी भागात भरवस्तीत देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरगुती जेवणाच्या मेसच्या नावाखाली हा देहविक्रीचा व्यवसाय केला जात होता. स्थानिक नागरिकांनीच हा प्रकार उघडा पाडला असून दोन महिला व चार पुरुषांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

अकोल्या (Akola News) शहरातील मोठी उमरी भागातील उच्चभ्रू वस्तीत हा देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. घरगुती जेवणाच्या मेसच्या नावाखाली हा संपूर्ण गोरखधंदा चालवला जात होता. मात्र, आज स्थानिक नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे. स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती मिळताच देहविक्री करणाऱ्या दोन महिलांसह चार पुरुषांना घरात कोंडून ठेवलं होतं. यानंतर सिव्हिल लाईन पोलीसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोन महिलांसह चार पुरुष ग्राहकांना ताब्यात घेतले. 

दरम्यान प्रति ग्राहकांकडून 2 हजार रुपये घेत ह्या महिला आपला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचं तपासात समोर आले आहे. या प्रकरणात अधिक तपास आता सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत. जवळपास दीड ते दोन तास घटनास्थळावर नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर स्थानिक नागरिकांचा संताप शांत झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

Banking News : मोठा निर्णय! या रविवारी बँका सुरू राहणार, ग्राहकांना दिलासा

Shocking : लॉजच्या बंद दाराआड सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली अन्....

भाजप नेत्याच्या निवासस्थानी देहविक्री करणाऱ्या भगिनींकडून गणेश पूजन अन् महाप्रसाद

Wedding Anniversary Gift Ideas: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जोडीदाराला द्या ‘हे’1 गिफ्ट; नात्यात वाढेल प्रेम

SCROLL FOR NEXT