Akola Crime Saam Tv
महाराष्ट्र

अकोल्यात युवकाची चाकूने भोकसून हत्या; मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील घटना

नंदू राजेश बगाळे (वय १९ ) असं मारेकरी आरोपीचं नाव आहे.

जयेश गावंडे

अकोला : रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या एका युवकावर तीन जणांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. उमेश अटाळकर असं हत्या (Murder) करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Akola Latest Crime News)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी रात्रीच्या सुमारास अकोला शहरातील मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली उमेश अंबादास अटाळकर हा बसलेला होता. त्यावेळी तिथे आलेल्या तीन युवकांनी त्याच्यावर अचानक चाकू हल्ला केला. या तिघांनी उमेशच्या छातीवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. जखमी झालेल्या उमेशला तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ऑटो रिक्षात नेवून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी व त्याच्या मित्रांनी रुग्णालय गाठले. त्यानंतर या घटनेची माहिती सिव्हिल पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावीसह पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहचले. तसेच श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ पथकही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या.

नंदू राजेश बगाळे (वय १९ ) असं मारेकरी आरोपीचं नाव आहे. त्याला सिव्हिल लाइन पोलिसांनी ताब्यात घेतलं. उमेश अटाळकर हा सतत मारेकरी नंदू अन् त्याच्या मित्रांना मारहाण करीत असायचा, यातून हे हत्याकांड घडल असल्याचे सूत्रांनी सांगितलं. तरीही हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. हे मारेकरी रेल्वे पुलाजवळील भागातील रहिवासी असल्याचं समजते. नेमकं या मारकऱ्यांमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग होता, हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही. सध्या नंदू पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याच्या साथीदारांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT