Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News: खळबळजनक घटना! माहेरी गेलेल्या विवाहितेला पतीकडून बेदम मारहाण; प्रकृती गंभीर

Akola Latest News: माहेरी गेलेल्या पत्नीला घरी जावून पतीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे.

Gangappa Pujari

हर्षदा सोनुने, प्रतिनिधी...

Akola News: माहेरी गेलेल्या पत्नीला घरी जावून पतीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील उमरी अरब गावात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपी पती सध्या फरार आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीवर सध्या उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोला जिल्हातल्या मुर्तीजापुर तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतल्या ग्राम उमरी अरब येथे पतीने सासरच्या घरी येऊन पत्नीला मारहाण करून जखमी केले व तेथून फरार झाला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा येथील समाधान राऊत यांचा विवाह उमरी अरब येथील पूनम खंडारे हिच्या सोबत झाला होता.

मात्र ह्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू असल्याने पूनम ही माहेरी गेली होती. तिला माहेराहून आणायला पती समाधान राऊत हा सासरवाडीला आला होता. यावेळी पती- पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात रागाच्या भरात आरोपी समाधान राऊतने पत्नीवर हल्ला केला. पती समाधानने पत्नी पूनमला बेदम मारहाण करून जखमी केले व तेथून पळ काढला आहे.

या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्याने पूनमची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर तिला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी भेट देऊन मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस मध्ये पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT