Famous Psychiatrist Dr. Prashant Jawarkar of Commits Suicide Saam Tv News
महाराष्ट्र

Akola Crime : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.प्रशांत जावरकर यांनी आयुष्य संपवलं, विषारी इंजेक्शन घेऊन आयुष्याचा शेवट

Famous Psychiatrist Dr. Prashant Jawarkar of Commits Suicide : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ.प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेत आपल आयुष्य संपवलं.

Prashant Patil

अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ.प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेत आपल आयुष्य संपवलं. अकोल्यातल्या न्यू तापडिया नगर भागातील त्यांच्या घरात त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.जावरकर हे डॉ. दीपक केळकर यांच्या सन्मित्र हॉस्पिटलमध्ये मानसिक तणावाने ग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करायचे.

दरम्यान, त्यांच्या आत्महत्येची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. प्राथमिक तपासात त्यांनी स्वतः विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. त्यांचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी शासकीय रुग्णालयात पार पडली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचं मूळ कारण अद्याप कळू शकलेलं नाही. डॉ.जावरकर यांच्या आत्महत्याची बातमी सर्वत्र समजताच अकोल्यात वैद्यकीय व मानसोपचार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सामाजिक आणि मानसोपचार तज्ज्ञांनीही या घटनेनंतर चिंता व्यक्त केलीय.

दरम्यान, आत्महत्या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत डॉक्टरच्या मोबाईलमध्ये किंवा घरात कोणतेही सुसाईड नोट आढळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारण होते का? याचा तपास पोलीस करणार आहे. डॉ.जावरकर यांच्या जाण्याने अकोला शहरात मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या क्षेत्राला मोठा धक्का बसलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Back Designs: साध्या साडीपासून पार्टी वियर साडीपर्यंत; ब्लाउजच्या या 7 फॅन्सी बॅक डिझाईन्स करा ट्राय

Maharashtra Live News Update: अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून होणार सुरू

Eye Yoga Exercise: चष्मा कधीच लागणार नाही, घरीच करा हे 5 योगा

मराठवाड्यातील भयान वास्तव! महिन्यात ७६ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले, सर्वाधिक संख्या बीडमधील

Viral Video: ४ वर्षांचा चिमुकला अंगणवाडीतच अडकला; आई-बाप रात्रभर शोधत बसले, सकाळी कुलुप उघडलं...!

SCROLL FOR NEXT