Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News: नवऱ्याने आणि पोटच्या मुलांनी आईला पाजलं विष; काळजात धडकी भरवणारं कारण आलं समोर

Crime News: संपत्तीसाठी पोटच्या मुलांनीच आपल्या आईला विष पाजलं आहे.

Ruchika Jadhav

Akola News: अकोल्यातून नात्याला काळिंमा फासणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. संपत्तीसाठी पोटच्या मुलांनीच आपल्या आईला विष पाजलं आहे. या कटात महिलेचा पती देखील सहभागी आहे. आपल्या दोन्ही मुलांंना हाताशी धरुन त्याने पत्नीला विष पाजलंय.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोला जिल्हातल्या बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हैसांग येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत वंदना भिमराव गवई असं विष पाजलेल्या महिलेचं नाव आहे.

संपत्तीसाठी मती भ्रष्ट

पती आणि मुलं आपल्या आईच्या नावावर असलेलं घर आणि शेती आपल्या नावावर करण्यास सांगत होते. शेती आणि घर नावावर करून देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेचा छळ करण्यात येत होता. मात्र महिला सर्वकाही सहन करत होती आणि त्यांना नकार देत होती.

घर आणि शेती नावावर करून देण्यास नकार दिल्याने दोन सख्या मुलांनी आणि नवऱ्याने मिळून महिलेला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांंनी महिलेला विष पाजले. सध्या महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये मुलं, सुना,आणि नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT