Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : अकोल्यात किरकोळ कारणावरून चाकू हल्ला; दोन घटनात ५ जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

Akola News : अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर गाडी जप्ती करण्याची कारवाई सुरु होती. गाडी जप्तीवरून काहींनी गोंधळ घालण्यास सुरवात यात काही जणांनी चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: अकोल्यात चाकू हल्ल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना अकोला रेल्वे स्टेशन परिसरात घडली. तर दुसरी घटना  एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत देखील शिवनी परिसरात घडली आहे. यात थेट चाकू हल्ला करण्यात आला होता. दोन्ही घटनांमध्ये मिळून पाच जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर गाडी जप्ती करण्याची कारवाई सुरु होती. गाडी जप्तीवरून काहींनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. यात काही जणांनी चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात गाडी जप्तीवरून वाद उफाळून आला होता. या वादात पाच तरुणांनी चाकूहल्ला करीत चौघेजण गंभीर जखमी केले. 

पोलिसांकडून तपास सुरु 

रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात इरफान अहमद याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तर झिया अहमद सईद अहमद, फैजान अहमद झिया अहमद, इरफान अहमद सईद अहमद आणि इमरान अहमद जाफर अहमद हे जखमी झाले आहेत. या सर्वांवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात रामदास पेठ पोलीस अधिक तपास करत आहेत. 

तिघांकडून तरुणावर हल्ला 
दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत देखील शिवनी परिसरात दुसरी घटना घडली. यात तिघांनी एकावर चाकू हल्ला करीत गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात एजाज खान हा जखमी झाला आहे. राहुल डोंगरे, मंगेश मेहेंगे आणि शुभम जगदाळे या तिघांनी मिळून एजाज खान याच्यावर चाकू हल्ला केला. शुल्लक कारणांवरून हा चाकू हल्ला झाल्याचा समजते. अकोला घडलेल्या दोन चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT