Akola Crime News: फेसबुक अकाउंटवर आपले नाव बदलून एका तरुणाने महिलेची फसवणूक केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अकोटमधून उघडकीस आली आहे. या तरुणाने आपली ओळख लपवून महिलेसोबत मैत्री केली. त्यानंतर जवळीक साधून तिचे वारंवार शारीरिक शोषण केले.
इतकंच नाही, अत्याचारानंतर त्याने ब्लॅकमेल करून महिलेकडून ३ लाख रुपये देखील उकळले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)
सैय्यद शरीफ सैय्यद शफी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या ३२ वर्षीय पीडित महिलेची (Akola News) आरोपी शरीफसोबत फेसबुक अकाउंटवरून ओळख झाली होती. शरीफने आपला धर्मचं नव्हे तर नावही लपवलं होते.
फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून सैय्यदने आपली ओळख प्रेम पाटील या नावानं दाखवली होती. फेसबुकवरून सतत बोलणे होत असल्याने कालांतराने दोघांमध्ये मैत्री झाली. काही दिवसांनी आरोपीने विवाहित महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.
तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत आरोपी शरीफने पीडितेला ब्लॅकमेल केलं. त्यानंतर अनेकवेळा पीडितेसोबत शारीरिक संबंध (Crime News) प्रस्तापित केले. इतकंच नाही, तर शारीरिक संबंध ठेवताना व्हिडीओ देखील बनवले. याच व्हिडीओचा आधार घेऊन त्याने पीडित महिलेला ब्लॅकमेल करणे सुरू केले.
आरोपीची क्रूरता इतकी वाढली होती, की पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवता यावे या उद्देशाने त्याने तिच्याच घरामागे एका रुम किरायाने घेतली होती. पीडित महिलेचा पती घराबाहेर गेला, की आरोपी तिच्या घरी जायचा आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा.
अखेर आरोपी सैय्यदच्या त्रासाला कंटाळून ३२ वर्षे महिलेने सर्व घटनाक्रम आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर पतीसह कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आता अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सैय्यद शरीफ सैय्यद शफी ला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.