Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola Crime : अकोल्यात दहावीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार, मैत्रिणीनेच केला घात; तरुणीसह तिघांवर गुन्हा

Akola Crime News : वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार अकोला शहरात घडला.

Satish Daud

वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता आरोपींनी पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढत तिला ब्लॅकमेल केलं. हा धक्कादायक प्रकार अकोला शहरात घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या मावशीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तीन तरुणांसह एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पायल असं अटक करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. उर्वरित आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ जिल्ह्यातील एक १५ वर्षीय मुलगी तिच्या चुलत मावशीकडे अकोल्यात शिकायला आली होती. पीडिता अकोल्यातली एका नामांकित शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेते.

शाळेत शिक्षण घेताना इथे एक तरुणीसोबत तिची ओळख झाली. या तरुणीने पीडितेची ओळख आपल्या चुलत मावशीसोबत करून दिली. तसेच तरुणीचा मित्र बंटी सटवाले याच्यासोबत देखील पीडितेची ओळख झाली. दरम्यान, पीडितेचा वाढदिवस असल्याने चुलत मामीचा पती लल्ला इंगळेने तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या घरी नेले.

तेथून पीडितेचा मित्र बंटी सटवाले, त्याची मैत्रीण पायल हे दुसऱ्या मामीच्या घरी गेले. तेथे लल्ला इंगळे आणि बटी सटवाले या दोघांनी मद्यपान केले. त्यांनी पीडितेला देखील जबरदस्तीने बिअर पाजली. इतक्यावरच न थांबता सॉफ्टड्रिंकमध्ये गुंगीचा औषध पाजले. पीडितेची शुद्ध हरपल्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी पीडितेचे नग्न व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी देखील आरोपींनी दिली. वेदना असाह्य झाल्याने पीडितेने घडलेला प्रकार आपल्या मावशीला सांगितला.

त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत पीडितेच्या मैत्रिणीला तातडीने अटक केली. इतर आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT