omicron Saam Tv
महाराष्ट्र

अकोल्यात विदेशातून आलेले 58 नागरिक नॉट रिचेबल; प्रशासनाची धास्ती वाढली!

यात कुणाचा मोबाईल बंद, तर काहींचा संपर्क क्रमांकच चुकीचा असल्याची माहिती समोर येतेय.

जयेश गावंडे

अकोला : बुलढाणा जिल्ह्यात ओमायक्रॉन चा पहिला रुग्ण आढळल्याने अकोल्यात प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट मोड वर आहे. दरम्यान, विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांचा ओघही वाढला आहे. विदेशातून आतापर्यंत 232 लोक जिल्ह्यात आल्याची नोंद आहे. त्यापैकी 58 लोकांशी अजूनही आरोग्य विभागाचा संपर्क होऊ शकला नाही. यात कुणाचा मोबाईल बंद, तर काहींचा संपर्क क्रमांकच चुकीचा असल्याची माहिती आहे.

हे देखील पहा :

अशातच बुधवारी शेजारीच असलेल्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात ओमायक्रॉन'चा (Omicron Variant) पहिला रुग्ण आढळल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे केवळ पाच सक्रिय रुग्ण आहेत. अकोलेकरांसाठी ही स्थिती दिलासादायक असली, तरी 'ओमायक्रॉन'ने चिंता वाढवली आहे. बुलढाण्यात विदेशातून आलेल्या नागरिकांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आल्याने अकोलेकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात विदेशातून येणाऱ्यांची संख्या ही 232 वर गेली असून यापैकी 174 नागरिक हे प्रशासनाच्या संपर्कात आहेत. मात्र, यापैकी 58 नागरिक अजूनही नॉट रिचेबल असल्याने प्रशासनाची धास्ती वाढली आहे. यापैकी 32 जण जिल्ह्यातील (Akola) आहेत. तर, 20 जण हे बाहेरील आहेत. 58 पैकी कुणाचा नंबर चुकीचा आहे. तर, कुणाचा फोन नंबर लागत नाही. त्यामुळे या 58 जणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याची माहिती आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT