Akola Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Akola Bus Accident: धावत्या बसमध्ये चालकाला आला हृदयविकाराचा झटका; भीषण अपघात बस पलटी; ३० प्रवासी गंभीर जखमी

धावत्या बसमध्ये चालकाला आला हृदयविकाराचा झटका; भीषण अपघात बस पलटी; ३० प्रवासी गंभीर जखमी

साम टिव्ही ब्युरो

Akola Bus Accident: अकोल्यात मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. अकोट ते पुणे जाणारी खाजगी लक्झरी बस शेगांव मार्गावरील हनवाडी फाट्यानजीक पलटल्याची माहिती समोर येत आहे. बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये ३० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला- दर्यापूर-अकोट मार्गे येथून पुणे करता जाणारी लक्झरी बस देवरी शेगाव मार्गावरील हनवाडी फाट्यानजीक रात्री सुमारे सव्वा सातच्या सुमारास पलटी झाली. त्यामध्ये ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्व जखमींवर अकोल्यातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अकोट येथून नियमित श्री गणेश ट्रॅव्हल च्या मालकीची एमएच ३० एच १२०१ ही लक्झरी बस पुणे करिता धावते सायंकाळी ६.३० वाजता ही बस अकोट वरून पुण्यासाठी रवाना झाली. दरम्यान, देवरी ते अडसूळ दरम्यान येणाऱ्या हनवाडी ते पिवंदळ फाट्यादरम्यान चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस बाजूच्या शेतात जावून पलटी झाली.

यामध्ये तब्बल ३० प्रवासी जखमी झाले असून त्यातील तीन जण गंभीर असल्याची माहिती आहे.या सर्व रुग्णांच्या मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थ पुढे आले, आठ रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील रात्री नऊच्या सुमारास आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.  (Latest Marathi News)

देवदर्शनावरून परतताना टँकर आणि जीपमध्ये भीषण अपघात

दरम्यान, आज सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये टँकर आणि जीपचा अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीजवळ हा अपघात झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

SCROLL FOR NEXT