Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Candidate Death : नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू

Akola News : अकोट नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अधिकृत महिला उमेदवारचा अपघाती मृत्यू झाला आहे. निवडणुकीपूर्वी निधन झाल्याने राष्ट्रवादी गटासह उमेदवाराच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Alisha Khedekar

  • अकोट निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का

  • महिला उमेदवाराचा परतवाड्यात अपघाती मृत्यू

  • पक्षात शोकाकुल वातावरण, प्रचार कार्यक्रम रद्द

  • जिल्ह्यात शोकाची भावना पसरली

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांची लगबग सुरु असताना अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोट नगर परिषद निवडणूकीत नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या अजित पवार गटातील उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. अलमास परविन शेख सलीम असं मृत पावलेल्या उमेदवाराचं नाव आहे. पती आणि मुलाबरोबर माहेरी जात असताना त्यांचा अपघात झाला असून या अपघातात त्या मृत पावल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक पदाचे महिला उमेदवार अलमास परविन शेख सलीम या आज त्यांचे पती आणि मुलासोबत त्यांच्या माहेरी निघाल्या होत्या. या दरम्यान अमरावतीतील परतवाडा येथे एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अलमास परविन शेख सलीम या अकोट नगर पालिकेतील प्रभाग क्रमांक ४ च्या राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाच्या त्या अधिकृत उमेदवार होत्या. मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, आज अकोट नगरपालिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली प्रचार सभा आणि प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. मात्र हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महिला उमेदवाराचा मृत्यू निश्चितच पक्षाला मोठी हानी देणारा असल्याच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT