Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : तुरीचा ट्रॅक्टर उलटला, मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेचा मृत्यू

Akola : अकोला शहरातील गीता नगर भागात असलेल्या हिंगणा रोडवरील जगदंबा मंदिराजवळ तुरीचा ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. तुरीच्या पोत्यानी भरलेली ट्रॅक्टर पलटी. ट्रॅक्टरखाली दबल्याने महिलेचा जागीच मृत्यू

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
Akola Latest News :
भल्या पहाटे अकोल्यामध्ये घडलेल्या दुर्देवी घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिला नर्सचा अपघाती मृत्यू झाला. तुरीने भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित झाला अन् उलटला. त्याखाली दबून महिलेचा जागीच मृत्यू झाला.

अकोला शहरातील गीता नगर भागात असलेल्या हिंगणा रोडवरील जगदंबा मंदिराजवळ तुरीचा ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. यामुळे तुरीच्या पोत्यानी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. याचवेळी मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या महिलेच्या अंगावर हा ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रतिभा किरडे असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. 

घरी परतत असताना मृत्यूने गाठले 

प्रतिभा किरडे या रोज सकाळी मार्निंग वॉक करण्यासाठी जात होत्या. त्यानुसार आज देखील सकाळी त्या फिरण्यासाठी गेल्या होत्या. एक राउंड मारल्यानंतर सकाळी नऊ वाजता सुमारास त्या घराकडे जात असताना गिता नगर परिसरात सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रतिभा या रस्त्याच्या कडेला चालत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट ट्रॅक्टर त्यांच्या महिलेच्या अंगावर पलटी झाला. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

ट्रॅक्टर चालक पोलिसांच्या ताब्यात 

सदर अपघात प्रकरणात जुने शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. तसेच ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी मृतकांच्या कुटुंबियांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT